Vidharbha

शक्ती कायद्याचा आधार घेऊन खोटी तक्रार केल्यास तक्रारदारावर कारवाई : यशोमती ठाकूर

अमरावती – राज्यातील महिला आणि मुलीवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन लवकरच शक्ती कायदा करणार आहे. या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या कायद्यामुळे अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळणार आहे, मात्र या कायद्याचा आधार घेऊन कुणी चुकीची आणि खोटी तक्रार केल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याची तरतूदही या कायद्यात नमूद असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला आणि मुलीवरील अत्त्याचार रोखण्यात यश येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना, या कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनी खुलासा केला आहे.

नव्या कायद्यात असा आहे बदल

  • तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
  • खटला चालविण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
  • अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरून ४५ दिवसांचा केला आहे.

नविन गुन्हे परिभाषित केले आहेत.

  • समाज माध्यमांमधुन महिलांना धमकावणे व बदनामी करणे.
  • बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला बाबत खोटी तक्रार करणे.
  • समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.
  • एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.
  • बलात्कार पिडितेचे नांव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला बाबत लागू करणे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!