Muktrang Nagpur Special News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर येणार वेबसिरीज

मुंबई – |राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आयुष्यावर वेबसिरीज तयार करण्यात येणार आहे. तुकडोजी महाराज यांचं कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावं यासाठी ही वेबसिरीज तयार करण्यात येणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या वेबसिरीजसाठी निधीची मागणी केली. ही मागणी अजित पवार यांनी मान्य झाली असून लवकरच वेबसिरीज येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिलीये.

नव्या पिढीपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचावे ती आज मोबाईल, लॅपटॉपवर जास्त असते. त्यामुळे चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद मिळेल अशी चर्चा एका बैठकीदरम्यान करण्यात आली. त्यामुळे वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सविस्तर चर्चा करून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!