Desh-Videsh Muktrang Special News

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक

मुंबई | मुंबईमध्ये एनसीबीकडून अजून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या या कारवाईतून मुंबईत ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आलीये.

यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांना ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडून ड्रग पेडरर रिगल महाकाला याला अटक केलीये.

रिगल महाकाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींशीही जोडलेला असल्याचं समोर आलंय. शिवाय एनसीबी गेल्या अनेक काळापासून रिगलच्या शोधात असल्याचं म्हटलं जातंय.

एनसीबीने लोखंडवाला तसंच ओशिवारा या भागात छापेमारी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!