Pune

पुण्यात महिला आमदारांचा मोत्यांचा हार चोरटयांनी पळविला

पुणे – पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरटयांनी आता आपला मोर्चा थेट आमदारांच्या घरावर वळविला आहे. पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर रोड येथे फिर्यादी ममता मिसाळ, पती दीपक, मुले आणि जावू माधुरी मिसाळ एकत्रित राहतात. २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या एका नातेवाईकांच्या समारंभा करिता त्यांना जायचे होते. त्यावेळी बेड रूममध्ये ठेवलेले दागिने त्यांनी पाहिले. मात्र त्यामध्ये हिरे मोत्यांचा हार आणि कडा सापडला नाही. त्यानंतर सर्व ठिकाणी शोधाशोध केली. तरीही दागिने सापडले नाहीत.

या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!