Pune

हर्षवर्धन जाधव विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे – कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जाधव आणि इषा झा यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन औंधवरुन संघवी नगरकडे निघाले होते. त्यावेळी जाधव यांनी आपल्या चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्यावरुन चड्डा यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिल्यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. आपलं हृदयाचं ऑपरेशन झाल्याचं चड्डा यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतरही मारहाण सुरुच ठेवल्याचा आरोप अमन चड्डा यांनी केला आहे.

अमन अजय चड्डा यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सध्या ते मनसेमध्ये आहेत. तसंच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणूनही त्यांची ओळख आहे.दरम्यान हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!