Pune

लस आली तरी जनजीवन पूर्ववत होण्यास एक वर्षे लागणार – पुनावाला

पुणे – पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकासाठी पुरेशी लस उपलब्ध होईल आणि जनजीवन करोना आधी होत तसं पूर्वपदावर येईल,” असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला सांगितले

करोनावरील लसीचा आपातकालीन वापर करण्यासाठी परवाना देण्यासाठी तीन औषध निर्माण कंपन्यांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे अर्ज केले आहेत. यात फायझर इंडिया, सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या कपंन्यांनी वापरासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.

या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्हाला आपातकालीन वापरासाठीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे. पण, व्यापक स्वरूपात लसीचा वापर करण्याचा मूळ परवाना नंतर मिळण्याची शक्यता आहे. तरीही आम्हाला विश्वास आहे की, जर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होऊ शकते,” असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!