Politics

मुनगंटीवार यांना अजित दादांचे थेट आव्हान, “चला मला पराभूत करूनच दाखवा” !

मुंबई -विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपले मुद्दे ठेवत असताना कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला.

त्यावेळी मुनगंटीवार यांनी, माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असं गंमतीने म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना थेट आव्हान दिलं.

सुधीर मुनगंटीवार :– माझं भाषण सुरू असताना मध्ये कोणी बोललं तर तो पुढच्या निवडणुकीत पराभव होतो…

दादा :- अजित पवार आज तुमच्या भाषणात मध्ये बोलतोय, चला मला पराभूत करूनच दाखवा, माझं चॅलेंज आहे तुम्हाला…

त्यावर मुनगंटीवार यांनी बगल देत आपले भाषण सुरु ठेवले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!