Politics

कंसालाही लाजवेल इतका रावसाहेब दानवेंना अहंकार !

औरंगाबाद – कंसालाही लाजवेल इतका अहंकार रावसाहेब दानवेंना आहे. ज्या प्रमाणे कंस राक्षसाचा अंत झाला तशीच रावसाहेब दानवे या मग्रुर नेत्याची अवस्था होईल,अशी कडवट प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला होता,त्यावर हर्षवर्धन जाधव यांनी कडाडून टीका केली आहे. औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

रावसाहेब दानवे यांचा तोल ढळला आहे. गेल्या वेळीही त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांचा तोल ढासळला आहे. ज्यांच्यामुळे अन्न मिळतं अशा शेतकऱ्यांना रावसाहेब दानवे यांनी चीन आणि पाकिस्तानचे हस्तक म्हटलं आहे. ही मग्रुरी आहे, जनता ही मग्रुरी उतरवल्याशिवाय राहणार नाही असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई असून, या दोघातील वाद नेहमीच चर्चेचा राहिला आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!