Politics

ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु ? – आ. प्रताप सरनाईक

मुंबई – घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याच्या वृत्तावर प्रताप सरनाईकांनी मौन सोडलं आहे. ”ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु ? ” असा खुलासा सरनाईक यांनी केला आहे. खोट्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया तसंच अभिनेत्री कंगना रणौतविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

“अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

सरनाईकांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रं मिळाली अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करुन माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या कंगनाविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. भविष्यात अजून बातम्या मिळतील, पण हे बदनामी करण्याचं कटकारस्थान आहे,” असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला.

 

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!