Politics

धनंजय मुंडेंसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवार यांचा युटर्न

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडें यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी, धनंजय मुंडेंसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी गुरुवारी माध्यमाशी बोलताना केले होते. आज मात्र त्यांनी युटर्न घेतला आहे.

“काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वारपरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत”, असे आज पवार म्हणाले.

“आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा,” असंहि पवार म्हणाले.

राष्ट्रवादीमध्ये दोन गट ?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडें यांचा राजीनामा घ्यावा की नाही यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. ‘पहाटेच्या शपथविधी’ची आठवण काही नेत्यांना झाल्याने मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळेच आज शरद पवार यांनी युटर्न घेतल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!