Politics

आ. गोपीचंद पडळकर यांचं पारंपरिक वेशभूषेत हटके आंदोलन

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसताना धनगर आरक्षणाचा विषय देखील प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे झोपेचं सोंग घेणाऱ्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात अभिनव आंदोलन केले.यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही समर्थन दर्शवले.

सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान भवनाजवळ अनोख्या पद्धतीने आंदोलन करत राज्य सरकारचा कडाडून निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या कारभारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र यावेळी त्यांना पोलीस बळाचा वापर करून अडवण्यात आले.

आ. पडळकर ढोल बडवत विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पडळकरांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी पडळकर मागण्यांचा एक भलामोठा फलक घेऊन आले होते.

दरम्यान आ. पडळकरांच्या समर्थनासाठी रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे नेते धावून आले. हे नाट्य संपत नाही तोच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी हुतात्मा चौक इथे जाऊन केंद्रीय कृषी कायद्याला दुग्घाभिषेक घातला. त्यानंतर सदाभाऊ घोत आणि पडळकर ही जोडी विधानभवनात जाण्यासाठी परतली. मात्र त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आल्याचा दाव करत त्या दोघांनी तिथेच ठिय्या मांडला. काही वेळांनी त्या दोघांना विधानभवन परिसरात प्रवेश देण्यात आला.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!