Politics

राष्ट्रवादीमध्ये एका जेलपेक्षा जास्त गुन्हेगार – निलेश राणे

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं आहे. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं त्यांनी म्हटलं आहे.“राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!