Politics

महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या जिव्हारी – अजित पवार

मुंबई – कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतीलकाम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल असेही अजित पवार म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकार असो विकास कामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात पवार साहेबांची ५०-५५ वर्षाची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी ३० वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतोय मी कधीही विकास कामात राजकारण आणलं नाही.उलट मदतच करत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!