Politics

भाजपचे दहा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

मुंबई – भाजपचे दहा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे.

हातकणंगले (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी पाटील यांनी हा दावा केला.

पाटील म्हणाले, गेले काही दिवस अनेक सदस्य आमच्याशी चर्चा करत आहेत. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत. तेथे त्यांना उबग आलेला आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. लवकरच आमच्याकडून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या दाव्यास होकार दिला. भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करून घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज आवळे यांच्या प्रवेशाने होत असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले

दरम्यान, हा दावा भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. हे तिघाडी सरकार डगमळीत आहे. आपापसातील मतभेदामुळे कधी पडेल हे सांगता यते नाही, आमदार फुटू नये म्हणून असे सांगावे लागते, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!