Politics

शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये – अशोक चव्हाण

मुंबई – शिवसेना हा पक्ष UPA मध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी UPA च्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

UPA चं अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय.त्याला चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करु नये, असा इशाराच चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!