Politics

पहिले ईडी, नंतर सीडी – एकनाथ खडसे

जळगाव – भोसरीच्या भूखंड प्रकरणी माझी पाचव्यांदा चौकशी होत आहे. तो भूखंड मी विकत घेतलेला नसून तो माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे ५ कोटींचा आहे. याप्रकरणी आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेन”, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचं नंतर बघू या!” अशी सूचक प्रतिक्रियाही खडसे यांनी दिली.

“३० डिसेंबर २०२० रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचं समन्स मला मिळालं आहे. त्यानुसार मी हजर राहणार आहे. या अगोदर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केलेली आहे. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलेलो आहे. आता देखील ईडी सांगेल त्या प्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे.असेही खडसे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नोटीसीवरून संताप व्यक्त केला आहे.“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खडसेंच्या ‘ CD’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “ED ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ED मागे लावते असं त्यांना वाटतंय का? EDची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न CDलावण्याचा… तुम्ही खुशाल CD लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”,

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!