Politics

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत

मुंबई | यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. प्रश्नांची देशाची जाण, लोकांची नाडी, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहे. तसेच त्यांचा अनुभव दांडगा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!