North Maharashtra

जयंत पाटलांचे आगळेवेगळे फोटोसेशन;चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली पोझ…

सांगली – “मला तुमचा फोटो काढायचाय…” असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच मंत्री जयंत पाटील यांनी त्या लहानग्याला तात्काळ पोझ दिली आणि ‘नीट काढलास ना रे फोटो’ असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली… हा किस्सा जयंत पाटील वाळवा येथील नवेखेड येथे दौर्‍यावर असताना घडलाय…

जेव्हा मंत्री आणि त्यांचा ताफा गावागावात फिरत असतो त्यावेळी लहानग्याचा तो कुतुहलाचा विषय असतो… त्या कुतुहलातूनच एका लहानग्याने मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला फोटो सध्या सांगलीत एक कौतुकाचा विषय ठरला आहे.

आज रोजच्या नियमाप्रमाणे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी ६ वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवला तो जयंत पाटील यांनी लगेच आणि तात्काळ पोझ देऊन…

लहानग्याला पोझ दिल्यानंतर त्याचे तोंडभरून कौतुकही केले. विशेष म्हणजे रुद्रने तोंडपाठ असलेल्या मंगलाष्टकाही जयंत पाटील यांना ऐकवून दाखवल्या.

रुद्रसारख्या लहानग्याचा बालहट्ट पुरवणारा असा एखादाच जयंत पाटील यांच्यासारखा मंत्री किंवा राजकीय नेता असू शकतो हे मात्र नक्की.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!