North Maharashtra

पत्रकार बाळ बोठे यांना दिलासा

नगर – रेखा जरे हत्याकांडात मुख्य संशयित आरोपी असलेल्या पत्रकार बाळ बोठे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी बाळ बोठेनं हजर राहावं, असा अर्ज पोलिसांनी कोर्टाकडे केला. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने तपास अधिकाऱ्यांची ही मागणी नामंजूर केली. आरोपी बाळ बोठेला कोर्टासमोर हजर राहण्याची गरज नाही, वकिलांमार्फत तो कोर्टाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करु शकतो असं कोर्टानं म्हटलं आहे.

रेखा जरेंची जातेगावच्या घाटात हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपींची चौकशी केल्यानंतर या घटनेचा मुख्य सूत्रधार हा पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. मात्र तेव्हापासून बाळ बोठे फरार आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तो सापडत नाही. मात्र, असं असलं तरी त्यानं वकील अॅड महेश तवले यांच्यामार्फेत कोर्टाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. ज्यावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!