Nagpur

पत्रकार गजानन जानभोर यांना पितृशोक

नागपूर : सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव जानभोर यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी दुपारी १२.५५ वाजता नागपूर येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांचे ते वडील होत.

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित जानभोर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात आले.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!