Nagpur

महेबूब शेखला तात्काळ अटक करा, नागपुरात गृहमंत्र्यांच्या घरासमोर भाजयुमोचे आंदोलन

नागपूर – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपुरात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केलं आहे. महेबूब शेख यास तात्त्काळ अटक करा तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याच्यावर औरंगाबादमध्ये दोन दिवसापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी त्यास अद्याप अटक केलेली नाही. यामुळे भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

एखाद्या सामान्य माणसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असता तर, पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली असती. मात्र महेबूब शेख हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने आणि सरकारमध्ये गुहमंत्री राष्ट्रवादीचे असल्याने त्यास अटक होत नाही, असा आरोप भाजयुमोने केला आहे.

महेबूब शेखला तात्काळ अटक करा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजयुमोचे कार्यकर्ते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करीत आहेत. आंदोलन करणाऱ्या ५० हुन अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!