Mumbai

जनतेने साथ दिलीय म्हणून इथपर्यंत – शरद पवार

मुंबई – मी आज ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचं काम करता आलं पाहिजे. त्यातून आपण शिकत असतो असे शरद बोलताना म्हणाले. ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेलं पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी तरुण पिढीला केले.

माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की, स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले.

कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण जयंतरावांनी एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली याचा आनंद आहे. हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!