Mumbai

मुंबईत रिक्षाचालकाची ‘दादागिरी’ कॅमेरात कैद

मुंबई – मुंबईत रिक्षाचालकाची ‘दादागिरी’ नवी नाही. कट मारल्याच्या वादातून एका रिक्षा चालकाने एका बाईकस्वाराला उडवल्याचा धक्कादायक व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे.

हा व्हिडिओ नेमका मुंबईच्या कोणत्या परिसरातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील शिवाजीनगर भागातील महामार्गावर 17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून त्या मुजोर रिक्षाचालकाविरोधात संताप व्यक्त करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेल्मेटमुळे बचावला

कट मारल्याच्या रागातून बाइकस्वाराने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षा चालकाला जाब विचारला. दोघांमध्ये बराच वाद झाला. नंतर ग्रीन सिग्नल झाल्यामुळे दोघंही पुढे निघाले. पण, थोड्याच वेळात मुजोर रिक्षा चालकाने त्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तो गाडीसह रस्त्यावर पडला. डोक्यावर हेल्मेट होता म्हणून तो वाचला. केवळ नशिब बलवत्तर म्हणून तो दुचाकीस्वार बचावला, कारण मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन त्याचा मृत्यूही होऊ शकला असता. केवळ सूड घेण्यासाठी म्हणून रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून रिक्षा चालकाविरोधात चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.

मुजोर रिक्षाचालक अखेर ताब्यात

कट मारल्याच्या वादातून बाईकस्वाराला उडवणाऱ्या मुजोर रिक्षाचालक सलमान सय्यद यास मुंबई पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. घाटकोपरच्या माता रमाबाई नगर मध्ये रहाणारे किशोर कर्डक हे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून घाटकोपर मानखुर्द लिंकरोड वरून शिवाजीनगर ला जात होते.या वेळी रिक्षा चालक सलमान सय्यद हा रिक्षा चालक भरधाव वेगात त्यांच्या बाजूने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षाचे चाक किशोर यांच्या पायावरून गेले.या वेळी किशोर यांनी फ्री वे च्या ब्रिज खाली असलेल्या सिग्नल जवळ त्या रिक्षा चालकाला गाठले आणि त्याला जाब विचारू लागले.या वेळी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली.सिग्नल सुटला आणि दोघे ही पुढे निघाले तेव्हा रिक्षा चालकाने मुद्दाम किशोर यांना जोरदार धडक दिली आणि पळ काढला.ही घटना त्यांच्या मागे असलेल्या एका गाडी मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि दोन दिवस मोठ्या प्रमाणत व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चालकाचा शोध घेऊन ताब्यात घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!