Mumbai

मुंबईत रेल्वे रुळावर दोन महिलांसह एका पुरूषाचा मृतदेह आढळला

मुंबई – नालासोपारा-वसई रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दोन महिलांसह एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला तर एक दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. एकाच कुटुंबातील चौघांनी मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सोमनाथ पोपट जंगम (वय ३१), नंदा पोपट जंगम (वय ५५) आणि प्रेमिला पोपट जंगम (वय ३५) हे जागीच ठार झाले. तर समीक्षा फडतरे ही दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. मालगाडीखाली चिरडले गेल्यानं तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह आणि जखमीला रुग्णालयात हलवले. मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मयत विरारमधील पूर्व साईनाथ नगर येथील रहिवाशी आहेत.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!