Mumbai

मुंबईत अनेक मंत्र्याकडे पाणीपट्टी थकली : वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत

मुंबई – मुंबईत सर्वसामान्य माणसाकडे पाणीपट्टी थकली की त्याचे नळ कनेक्शन बंद केले जाते, मात्र मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्याकडे लाखो रुपयाची थकबाकी असताना, मुंबई पालिका गप्प आहे. सर्वमान्यांप्रमाणे मंत्र्यांवरही कारवाई केली जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचं समोर आलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे.

पाहा कोणत्या मंत्र्याकडे किती थकबाकी ?

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!