Main News

 धनंजय मुंडे यांच्या विरुद्धची बलात्काराची तक्रार मागे

मुंबई – महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते  धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणावर पडदा पडला आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने डी.एन. पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दिली होती  या तक्रारींमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती. महिलेने निवेदन देऊन हे आमचे घरगुती प्रकरण असून थोडा वाद झाल्यामुळे तक्रार केली होती. पण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे मी बलात्काराची तक्रार मागे घेत असल्याचं तिने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

त्यामुळे आता संबंधित महिलेने डी.एन पोलीस ठाण्यातील धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. या महिलेने आपल्या जबाबात सांगितलं की, गेल्या काही वेळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असे तिने सांगितलं आहे. तसेच आपली कोणतीही तक्रार नाही असे देखील तिने सांगितलं आहे.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!