Main News

धनंजय मुंडे विरुद्धच्या त्या व्हिडीओ क्लिपमध्ये दडलंय काय ?

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे विरुद्ध बलात्काराचा आरोप क्रमणाऱ्या रेणू वर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी खळबळजनक दावा केला आहे. आपल्या अशीलावर दबाब टाकला जातोय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्यामुळे आपण पुरावे मी उघड करु शकत नाही. तपासातून अनेक गोष्टी समोर येतील. व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर अनेकांची तोंड बंद होतील. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी या गोष्टी उघड करु शकत नाही”असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

“मागच्या चार दिवसांपासून आम्ही तक्रार केली आहे. पण ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत. संबंधित मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा माझ्या अशीलावर जो आरोप केला जातोय, तो खोटा आहे. माझी अशील महिन्याला १० ते १२ हजार रुपये भाडं भरुन पेईंग गेस्ट म्हणून राहते. तिची स्वत:ची कुठलीही प्रॉपटी नाहीय. गाडी किंवा घरही नाहीय. एखाद्याला ब्लॅकमेल करणारी महिला अशी राहणार नाही” असे रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

माझ्या अशीलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून दागिने विकून ती स्वत:ची गुजराण करतेय. तिच्यावरील ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रेणू वर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याकडे खरंच व्हिडीओ क्लिप आहेत का ? त्या क्लिपमध्ये नेमकं काय दडलंय ? अशी उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

महिला ब्लँकमेलर

दरम्यान रेणू शर्मा या महिलेविरोधात आता भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.“२०१० सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

दरम्यान, मनसे नेते मनीष धुरी यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या लोकांना हेरायचा ती प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मी ही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. आत जर हेंगडेंनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे तर मी देखील तक्रार दाखल करणार आहे”

 

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!