Main News

पीडित महिलेचा सनसनाटी आरोप, धनंजय मुंडेंकडे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ … व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी…

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवार यांनी युटर्न घेतला आहे तर पक्षाच्या बैठकीत मुंडेंचा राजीनामा घेण्यावरून दोन गट पडल्याने निर्णय अनिर्णित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला असताना आता तक्रारदार महिलेनं त्यांच्यावर सनसनाटी आणि गंभीर आरोप केले आहेत.

‘२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला,’ असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिला रेणू शर्मा हिने ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे गंभीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप पीडित रेणू शर्मा हिने केला आहे.

भाजपचे नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरींनी केलेल्या आरोपांवरही तक्रारदार महिलेनं भाष्य केलं. ‘मी हेगडे यांचा आदर करायचे. आताही मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आमची भेट प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. ते स्वत: पुढाकार घेऊन माझ्याशी बोलले. मुंडेंनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळेच आता हेगडेदेखील माझ्यावर आरोप करत असावेत. कदाचित ते मुंडेंचे मित्र असावेत,’ असं महिलेनं सांगितलं.

‘मनिष धुरी यांना मी एका कामासाठी भेटले होते. एकदा माझ्या व्हिडीओ अल्बमचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. पण संबंधित कंपनी माझा व्हिडीओ अल्बम रिलीज करत नव्हती आणि मलाही देत नव्हती. तेव्हा मी धुरी यांच्याकडे मदत मागितली. ती अनेकदा मला फोन करायचे. तू कुठे राहतेस, कोणासोबत राहतेस याबद्दल त्यांनी विचारणा केली. त्यावेळी धनंजय मुंडे माझ्या बहिणीचे पती असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी धुरींनी मुंडेंबद्दल अपशब्द वापरले होते. पण आता तेच धुरी मुंडेंच्या बाजूनं बोलत आहेत,’ असं महिलेनं सांगितलं.

पीडित महिलेच्या वकिलास धमकीचे फोन

पीडित महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. महिलेवर केले गेलेले आरोप केवळ तिला एकटं पाडण्यासाठी आणि आमची बाजू कमकुवत करण्यासाठी होत आहेत असेही म्हणाले.

मुंडेविरुद्धजनहित याचिका दाखल

लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे सध्या अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. धनंजय मुंडे यांनी समाजापासून आपल्याला आणखी दोन मुले असल्याची माहिती दडवून ठेवली. निवडणुकीपूर्वी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्याबाबत खोटी माहिती दिली. असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!