Main News

ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय – अनिल देशमुख

मुंबई – ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे ,असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

 

ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा

कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत. जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिलस्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या- त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!