Main News

मेसेज आला तरच करोनाची लस मिळणार – राजेश टोपे

मुंबई – केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जातआहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही असेही टोपे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. १८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

राज्यात आज 4304 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4678 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1769897 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 61454 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.1 टक्के झाले आहे, असेही टोपे यांनी शेवटी सांगितले.

ही बातमी लगेच शेअर करा ...

1 Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: