Main News

मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी – उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, कोरोना महामारीची लस आल्यानंतरही मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

आपल्या संवादात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावाच लागेल. पूर्ण नाही पण काही प्रमाणात तरी संसर्ग कमी होईल. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगणे कुटुंबप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लग्नसराई सुरू झाली की ‘यायच हं!’ असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. माता भगिनींना परत सांगतो, आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ‘काही जणांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूचवले आहे. काही जणांनी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचे सांगितले आहे. पण, मला वाटत नाही की, रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज आहे. मी जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो की, बहुतांशी लोक सूचनांचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंतु कसे थांबवायचे? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेला आहे,’ असेही ते म्हणाले.

मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी – उद्धव ठाकरे

आरे कारशेड मेट्रो ३ साठी करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे.

“आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!