Main News

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी-फडणवीस

मुंबई – अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात ठाकरे सरकारला न्यायालयाने चपराक दिली असतानाही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोललं की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकावलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टाने या दोन्ही प्रकरणात जे ताशेरे ओढले आहेत त्यानंतर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. तरीही यातून सुधारण्याच्या ऐवजी सत्तेचा अहंकार हे सरकार दाखवतं आहे. सत्तेच्या अहंकारातून सरकार कशाप्रकारे वागतं ते आत्ताचं सरकार तेच दाखवून देतं आहे. असं अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे सरकार अहंकारी आहे. या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहे. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!