Main News

धनंजय मुंडेंवर आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण ?

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली, त्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रेणू अशोक शर्मा असं या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे.रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती.

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय १६-१७ इतकं होतं. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. आपण (रेणू) घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.

“धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता,” असंही रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठं मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेट घडवून देईन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहीण घराबाहेर गेल्यानंतर धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचे,” असं रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भाजप आक्रमक, राजीनाम्याची मागणी

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा महिला मोर्चा ठाकरे सरकारविरुद्ध मुंडेंच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुंडे यांनी सविस्तर खुलासा करत सहमतीनं संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,” अशी मागणी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!