Main News

“मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी”

मुंबई | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नकार दिला आहे. यावरुन राज्य सरकारवर सगळे निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा हा केवळ सरकारचा किंवा वकिलांचा लढा नसून, हा संपूर्ण समाजाचा लढा आहे.  केंद्राच्या पातळीवर संसदेत काही निर्णय घेतले तर मराठा आरक्षणाला संविधानिक संरक्षण मिळू शकते.  त्याऐवजी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर टीका करणे दुर्दैवाचे आहे. उलटपक्षी त्यांनीच पुढाकार घेऊन या प्रकरणी केंद्र सरकारला पुढाकार घेण्यास भाग पाडले पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!
%d bloggers like this: