Latest News

रेखा जरे खून प्रकरणी मीडिया ट्रायल नको – कोर्ट

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणाची मीडिया ट्रायल होऊ नये. या घटनेमध्ये आपण थिल्लारपणा सहन करणार नाही. प्रसारमाध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे तसेच, सुनावणीदरम्यान किंवा पोलिस तपासात माध्यमांकडून वार्तांकन करताना संयम सुटल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी आज शुक्रवारी दिली.

रेखा जरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, त्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.11) सुनावणी होणार होती. पण तपासी अधिकारी पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांचे म्हणणे दुपारपर्यंत सादर झाले नव्हते. तत्पूर्वी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील न्यायालयात हजर झाले, यावेळी त्यांनी सुनावणी सोमवारी (दि.14) ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली.

हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त होताना जपून लिहावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही कोर्टाने बजावले.यावेळी बोठे यांचे वकील महेश तवले यांनी समाज माध्यमांवर काही समाजसेवक या रेखा जरे खून प्रकरणाविषयी चुकीची पोस्ट शेअर करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्या पोस्टची प्रिंट तात्काळ जमा करा, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला आहे. याशिवाय अन्य पुरावे मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, तपासाच्या दृष्टीने सर्वच माहिती उघड करणे शक्य होणार नाही.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!