Latest News

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा – फडणवीस

मुंबई – ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याबद्दलचं कलम टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.


मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असं म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

या सरकारमधील मंत्र्यांनीच ओबीसी समाजाच्या आरक्षणपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मला आश्चर्य वाटतं, सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढतात, खरं तर राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. सरकारमध्ये आहांत ना मग मंत्रिमंडळमध्ये विषय मांडा. तिथे बोलणार नाही, तिथे गप्प, मात्र बाहेर बोलणार अशी स्थिती असल्याचे फडणवीस म्हणाले.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!