Latest News

हनी ट्रॅप मालिका चालविल्यामुळे बाळ बोठेना फसवण्यात आलं – युक्तीवाद

अहमदनगर : बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनी ट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळंच या प्रकरणात बोठे यांना फसवण्यात आल्याचा युक्तीवाद अॅड. महेश तवलें यांनी आज सुनावणीच्या वेळी केला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने आज राखून ठेवला आहे. आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला. त्यामुळं आता ही सुनावणी बुधवारी (16 डिसेंबरला) होणार आहे.

हनी ट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग तो सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? बाळ बोठे भिंगारदिवेशी सतत फोनवर का बोलत होता? हत्याकांडाचा आणि कॉल डिटेल कशा जुळतात? आणि रेखा जरेंनी लिहलेल्या पत्रात बाळ बोठेचा उल्लेख कसा? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीष पाटील यांनी तवलेंचा युक्तीवाद खोडून काढला. हनी ट्रॅप बाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. हॅनीट्रॅपची पोलिसांनी चौकशीही केलेली नाही. त्यामुळं हत्याकांडाचा आणि हनीट्रॅपचा काहीही संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!