Latest News

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

‘मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

फडणवीस यांचा टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या शेर वरून देखील फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. “चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांनी साधला संजय राऊतांवर निशाणा …

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवली असल्याचं म्हटलं जात आहे. मी संजय राऊत यांना विचारू इच्छितो, तुमचा तुमच्या कुटुंबाचा पीएमसी बँकेसोबत काही आर्थिक व्यवहार झाला होता का? काय आर्थिक व्यवहार झाला होता, तो देखील जनतेसमोर मांडावा. तुमच्याकडे या अगोदरही या संबधी काही माहिती कुठली नोटीस आली होती का? ही बाब देखील जनतेसमोर मांडावी. दहा लाख लोकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकेलेले आहेत. पीएमसी बँक पुनर्जीवित व्हायला हवी असे आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रकारे तिच्या लाभार्थींची देखील चौकशी व्हायलाच हवी. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!