Latest News

कर्जमाफी नव्हे ऊस बिलातून ठाकरे सरकार कर्ज वसुली करत आहे – भोसले

मुंबई – आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच राज्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊसाच्या बिलातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे असणारे कर्ज वसूल करण्याचे आदेश ठाकरे सरकारने साखर आयुक्त सारख्या सरकारी नोकऱ्यांच्या माध्यमातून दिले आहेत ,त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याच्या थापा मारणारे ठाकरे सरकार आता शेतकऱ्यांची विविध मार्गाने कर्जवसुली करून आपण शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचा प्रत्यय आणून दिल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

सर्व कारखानदारांनी गाळपास आलेल्या ऊसाची माहिती बँक अधिकाऱ्यांना देऊन कर्ज वसुलीस सहकार्य करण्याचे आवाहनही साखर आयुक्तांनी केले आहे. ऊस पुरवठादार यांच्या ऊस बिलाची रक्कम कर्ज असलेल्या बँक खात्यातच जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या पहिल्या हप्त्यापोटी एफ आर पी ची पूर्ण रक्कम एकरकमी शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दरही व्यवस्थित दिला जात नाही ,त्यातच कर्ज कपातीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीच्या फटक्यामुळे यंदा ऊस तोडणीला विलंब लागला. ज्या कारखान्यांची मागील हंगामातील थकबाकी शेतकऱ्यांना देणे बाकी आहे ती थकबाकी ही थकबाकीची रक्कम ही काही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. चालू हंगामासाठी अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम सुरू केले आहेत. परंतु जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी अनेक कारखान्यांनी आपला प्रतिटन ऊसदर स्पष्टपणे जाहीर केलेला नाही .यावर्षी शेतकऱ्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे .

कोरोनामध्ये एक वर्षाच्या कर माफ करावा तसेच खत व औषधांचा दर कमी करावा आदी मागणी सरकारने मान्य करण्याऐवजी ऊस बिलातून कर्जाची वसुली करण्याचा सपाटा आता ठाकरे सरकार करत आहे परंतु आता ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊस बिलातून कर्जाची रक्कम बँकेत कपात करू नये असे आवाहनही ॲड भोसले यांनी केले आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!