Latest News

राम मंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता – फडणवीस

मुंबई – राममंदिर उभारण्यासाठीचा लढा हा पराजीत मानसिकतेत वावरणाऱ्या हिंदू समाजाला जागे करण्यासाठीचा लढा आहे. या लढ्याचा समग्र आढावा घेणारे ‘अयोध्या’ हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाईल,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. फडणवीस बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा होते.

फडणवीस म्हणाले की,  भांडारी यांनी सखोल संशोधन करून अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती लढ्यामागची प्रेरणा विस्ताराने कथन केली आहे. हिंदू समाजाला कायम पराभूत मनोवृत्तीत ठेवण्यासाठी परकीय आक्रमकांनी राम मंदिर उध्वस्त केले. या मानसिकतेमधून हिंदू समाजाला बाहेर काढण्यासाठी हा लढा सुरू करण्यात आला.

अयोध्या आणि रामजन्मभूमी या विषयावर धादांत असत्य पसरवण्याचा प्रयत्न झाला. या विषयातील सत्य जगासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला. या विषयावर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मनोगत लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!