Kokan

रत्नागिरीजवळ भीषण अपघात: 50 फूट खोल दरीमध्ये खासगी बस कोसळली 

रत्नागिरी –   चिंतामणी नावाची खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असताना कशेडी घाटात तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळून हा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तात्काळ बचावकार्य सुरु करत २५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुर्दैवाने सात वर्षाच्या एका लहान मुलाला अपघातात जीव गमवावा लागला आहे. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजलं नसून पोलीस तपास करत आहेत.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!