Entertainment

जान्हवी अन् कार्तिकमध्ये नक्की काय शिजतंय ?

आगामी दोस्ताना 2 या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता कार्तिक आर्यन एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, डान्स, जिमसाठीसुद्धा दोघे सोबत येतजात आहेत. निमित्त चित्रपटाचे असले तरी दोघांच्या वाढत्या भेटीगाठी आणि जवळीक यामुळे वेगळाच संशय सध्या येऊ लागला आहे. दोघांत काहीतरी शिजत असल्याची चर्चा आहे.

जान्हवीला अनेकदा कार्तिक आर्यनच्या घराजवळ पाहिलं गेलं आहे. विशेष म्हणजे ती इमारतीच्या मागच्या गेटमधून निघून गेली. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा पसरली आहे. जॉन इब्राहिम, प्रियांका चोप्रा आणि अभिषेक बच्चन यांचा दोस्ताना चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटाचा सिक्वेल येत असून, यात जान्हवी- कार्तिक मुख्य भूमिकेत आहेत.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नवीन वर्षात दोस्ताना 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्ददर्शकांनी मोठ्या पडद्यावर आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दोस्तान 2 चे प्रदर्शनसुद्धा पुढे ढकलले गेले आहे.

दुसरीकडे जान्हवी आणि कार्तिकच्या नात्याची मात्र वेगळीच कथा आकार घेत आहे. शूटिंगच्या निमित्ताने एकत्र आलेले दोघे शूटिंग झाल्यानंतर मात्र जास्तच जवळ आल्याचे दिसत आहेत. एकमेकांच्या घरी जाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दोघांचे दिनक्रम सुरू आहेत. त्यामुळे दोघांत प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!