Desh-Videsh

कोरोना लसीकरणाची तारीख ठरली,या तारखेपासून सुरु होणार लसीकरण …

नवी दिल्ली – देशात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली.

आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे” असे केंद्राने म्हटले आहे.

कोविड 19 लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात आली. काल म्हणजे शुक्रवारी संपूर्ण देशात दुसऱ्यांदा ड्राय रन घेण्यात आलं. या दरम्यान लसीची तयारीचा आढावाही घेण्यात आला

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!