Desh-Videsh

देशभरात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी

नवी दिल्ली – कोरोनासोबत जगायला जनता शिकली असली तरी अनेक नामांकित कंपन्यांनी कोरोनाची लस बाजारात उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता ही लस देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत कशी पोहोचवता येईल याचे व्यवस्थापन पर्यायाने त्याची अंमलबजावणी अगदी जोरदार होताना दिसतेय, हे लसीकरणाचे काम अक्षरश: निवडणुक मोहिमांच्या धर्तीवर युद्धपातळीवर सुरू आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेत सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कामगार वर्ग यांचे लसीकरण करण्यात येणार असून ज्यामुळे कोरोना व्हायरस विरूद्ध यांची रोगप्रतिकारक क्षमता ओळखण्यात येईल.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्याच दिवशी देशात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी खुलासा केला आहे की, राष्ट्रीय पातळीवर 2000 हून अधिक मास्टर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ते देशाच्या 700 हून अधिक जिल्ह्यांत राज्य व जिल्हांमध्ये समानपातळीवर लसीकरणाची प्रक्रिया करताना दिसतील. जसे आपण निवडणुकांच्या वेळी जय्यत तयारी करतो अगदी त्याचप्रमाणे सर्व वैद्यकीय संघाच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लसीकरणाची कार्यपद्धती निवडणुका आयोजित करण्याइतकीच आहे, जिथे एका बूथवरून अनेकांना प्रशिक्षण दिले जाईल.

केद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक व सर्व राज्यांत तथा केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य प्रशासकांसह कोव्हिड 19 लसीकरणाच्या तयारीबाबतीत स्थळांवरील सुसज्जतेचा आढावा घेण्यासाठी यापूर्वीच एक उच्चस्तरीय ऑनलाईन बैठक आयोजिली होती. ही ड्राय रनची प्रक्रिया कमीतकमी राज्यांच्या राजधानीत किमान 3 सत्रात घेतील जाणार असून काही राज्यांमध्ये अशा जिल्ह्यांचाद्खील समावेश आहे जे दुर्गम भागात असतील किंवा जिकडे लॉजिस्टिक्सची अडचण भासू शकते. अपवादात्मक महाराष्ट्र व केरळ राज्यांत राजधानीच्या व्यतिरिक्त अऩ्य मोठ्या शहरांत हे ड्राय रन अंमलात आणले जाईल असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

ड्राय रनचे महत्त्व

ड्राय रन घेण्यामागे सरकारने अनेक हेतू स्पष्ट केले त्यात अशा गोष्टी नमूद केल्या आहेत की, Co – Win ऐप वापराच्या कार्यात्मक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच लसीकरणासंबंधित कामांचे नियोजन व अंमलबजावणी दरम्यानच्या संबंधांची चाचणी घेण्यासाठी याशिवाय देशभरात होऊ घातलेल्या या कोरोना लसीकरणाची अंमलबजावणीपूर्वी येणारी आव्हाने ओळखली जावीत व पूर्ण मार्गदर्शक मार्ग समजण्यात यावा. तसेच ड्राय रन घेतल्याने विविध स्तरांवरील कार्यक्रम व्यवस्थापकांना आत्मविश्वास मिळेल व कामाला हुरूप येईल असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले. 20 डिसें 2020 रोजी मंत्रालयाने जारी केलेल्या औपरेशनल मार्गदर्शक सूचनांनुसार लस देण्याचे नियोजन केले जाईल. त्यासाठी सुमारे 96000 लसीकरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, सुमारे 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 2360 प्रशिक्षकांचा सहभाग असेल तर राष्ट्रीय प्रशिक्षणात 57000 हून जास्त प्रशिक्षक असतील तर जिल्हापातळीवर 710 जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे समजते.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!