Desh-Videsh

भाजपा शेतकऱ्यांसोबत मात्र सुडो शेतकऱ्यांसोबत चर्चा नाही – भाजप

मुंबई – केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपा शेतकऱ्यांसोबत आहे मात्र सुडो शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की , दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशविरोधी तुकडे-तुकडे गॅंग सक्रिय झाली आहे पण भाजप अशा लोकांचे मनसुबे कदापि यशस्वी होऊ देणार नाही. शाहिनबागच्या निमित्ताने महिलांना पुढे करून सुडो सेक्युलर म्हणजे ढोंगी धर्मनिरपेक्ष सक्रिय होते तसेच आता खोट्या शेतकऱ्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे करण्यात आले आहे.

भाजप हा पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट देखील केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सर्वांना मान्य होईल असा तोडगा निघावा, यातून सुवर्णमध्य निघावा हे सर्वांनाच हवे आहे. पण या आंदोलनात जे शेतकरी नाही त्यांनी यात भेसळ करून आंदोलन विषारी केले आहे. अशा लोकांसोबत चर्चा होऊच शकत नाही.

हे आंदोलन शेतकऱ्यांचे असल्याचा भास निर्माण केला जातोय मग या आंदोलनात खालिस्तानी नारे का लावले जात आहे? आंदोलनात हिंदूंबद्दल आक्षेपार्ह घोषणा का दिल्या जात आहे ? शाहिनबाग प्रमाणे या आंदोलनाला जातीय रंग का दिला जात आहे ? कॅनडातून आम्हाला पैसे येतील आणि हे आंदोलन सुरु राहील याचा काय अर्थ ? असे अनेक मुद्दे जे आंदोलनांच्या निमित्ताने समजून घेण्याची गरज आहे. या आंदोलनात फक्त २ घटक आहेत आणि ते म्हणजे १) शेतकरी आणि २) ढोंगी धर्मनिरपेक्ष किंवा ढोंगी शेतकरी. भाजप हा नेहमी शेतकऱ्यांसोबत आहे आणि पुढे देखील राहील यात कुणालाच शंका नसावी.

भाजप सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे , पण तितकीच ढोंगी धर्मनिरपेक्ष आणि ढोंगी शेतकरी यांच्या विरोधात आहे. भाजप शेतकऱ्यांशी चर्चा करून नवीन कृषी कायद्यांबाबत नक्कीच सुवर्णमध्य काढेल पण देशविरोधी तुकडे-तुकडे गॅंगचे कारस्थान कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असेही भाजपने म्हटले आहे. – शिवानी दाणी – वाखारे,चर्चा प्रतिनिधी, भाजपा प्रदेश,सरचिटणीस, प्रदेश भाजयुमो यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!