Desh-Videsh

रामाचे मंदिर वर्गणीतूनच होणार, खंडणीतून नव्हे !

मुंबई – संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि पर्यायाने सेनेवर लवकरच “हे राम !” म्हणण्याची वेळ येणार असेच दिसते आहे. ज्यांना वर्गणी माहीतच नाही. खंडणीवरच ज्यांना विश्वास आहे. त्यांना वर्गणीचे महत्व कसे कळणार? त्यामुळे राम मंदिरासाठी चटकन खंडणी वसूल करून मोकळे व्हावे, असे संजय राऊत यांना वाटणे स्वाभाविक. पण ते राम मंदिर आहे. कोण्या पक्षप्रमुखाची संपत्ती नाही. राम मंदिर लोकवर्गणीतूनच होणार. खंडणीतून नव्हे ! असा टोला भाजपा प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी मारला आहे.

न वाचल्या जाणाऱ्या सामना मधून आज संजय राऊत यांनी पुन्हा आपल्या अक्कलचे तारे तोडले आहेत. लोकवर्गणीतून राम मंदिर बांधले जाणे हे सेनेच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे. सोनियांच्या पावलांनी बाराची मती वापरून महाराष्ट्रात सत्ता हस्तगत केल्यानंतर सेक्युलर सेनेला वारंवार आपल्या आकांना खुश करावेच लागणार ! थोडाही शब्द चुकला की दिल्लीश्वरांकडून फर्मान सुटणार आणि बापलेकांना हात रुमालात गुंढाळून, माना झुकवून कुर्निसात करावा लागणार ! वडिलांना दिलेला सत्तेचा शब्द पाळण्यासाठी हे करावेच लागणार.

सुडाचा प्रवास सोपा नसतो. राष्ट्रीय अस्मितेचे सर्वोच्च प्रतीक असलेले मर्यादा पुरुषोत्तम, धर्मरक्षक राजा रामचंद्र राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये, असे सेक्युलर सेनेला वाटणे स्वाभाविक आहे. बरं विकासावर राजकारण झालं पाहिजे हे सांगतात कोण, तर जे स्वतःच विकासकामांमध्ये मोठा अडसर बनले आहेत. स्थगित्यां पलिकडे ज्यांनी काहीच करून दाखवले नाही. ज्यांचा राजकीय प्राणवायू केवळ आणि केवळ भाजपाद्वेष आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेऊन आपली अकार्यक्षमता लपू शकते असे ज्यांना वाटते. ते विकासाच्या गप्पा मारतात हे हास्यास्पद आहे.

ज्यांच्या मुळे शिवसेना आहे, त्यांचे स्मारक बांधू न शकलेले, ज्यांच्या नावावर पक्ष आहे त्या छत्रपतींचे स्मारक अडवून बसलेले निर्लज्जपणे नाकाने कांदे सोलतात, हा बेशरमपणाचा कळस आहे !

श्रीरामजन्मभूमीवर राम मंदिर उभे व्हावे म्हणून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातले हिंदू आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आतुर आहेत. धर्मरक्षक राजा राम हा राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये असे शिवसेनेला वाटते. तुमच्या वाटण्याची कोणाला तमा आहे ? श्रीराम हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय नव्हता म्हणूनच तर छद्म धर्मनिरपेक्षता बोकाळली. मतपेटीसाठी अनुनयाचे राजकारण झाले. तुम्ही पहिले इतर राज्यांमध्ये नोटापेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. महाराष्ट्रात जे हाती लागले ते टिकवण्याचा प्रयत्न करा. जनता धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. अजूनही सावरा नाही तर अग्रलेखात उल्लेखिल्या प्रमाणे “हे राम !” म्हणण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!