Desh-Videsh

कृषी कायद्याबाबत नरेंद्र मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात, म्हणाले …

नवी दिल्ली – कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं.

“तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे,” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही देतानाच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली.मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,”

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!