Desh-Videsh

कृषी क्षेत्राच्या आड येणाऱ्या सर्व भिंती पाडणार – मोदी

नवी दिल्ली – “कृषी क्षेत्राच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे बाजार उपलब्ध होती. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांना फायदाही होईल आणि नवनवे पर्यायही उपलब्ध होतील,”असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे. “शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्रानं कृषी क्षेत्रावर हवं तसं काम केलं नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगलं काम करत आहेत त्यांना अधिक चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे,” असंही ते म्हणाले.

‘अलीकडील कृषी सुधारणे शेती व त्याच्याशी जोडलेल्या क्षेत्रामधील अडथळे दूर करीत आहेत. आता नवीन बाजारपेठ, नवीन पर्याय आणि तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.भारतातील बाजारांचं आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वात कमी आहे. देश आज प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होतं तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचं मोदी म्हणाले.

एकीकडे दिल्लीच्या सीमांवर शेतकरी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असताना, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!