Desh-Videsh

कृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…

नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. मात्र काल 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेनंतर देशातून याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली होती.

ही बैठकही कोणत्याही तोडग्याविना संपल्याची माहिती समजत आहे. तर केंद्र सरकारने या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात तसा लेखी प्रस्ताव केंद्र सरकार आज म्हणजेच बुधवार 9 डिसेंबरला शेतकऱ्यांना देणार असल्याचं समजतंय.

याआधीही शेतकरी आणि केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र त्या बैठकांमध्येही कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामध्ये 9 डिसेंबरला पुन्हा बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ही बैठकही रद्द करण्यात आली असल्याचं मुला यांनी सांगितलं.

दरम्यान, आज सिंधू बॉर्डरवर 12 वाजता शेतकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. त्या होणाऱ्या बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे सचिव हनन मुला म्हणाले.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!