Blog

कच्चे तेल- जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा बिंदू

२ नोव्हेंबर रोजीच्या डब्ल्यूटीआय वरील सर्वाधिक नीचांक $३६/बीबीएल आणि ब्रेंट ऑइल $३८/बीबीएल दरांवर आल्यानंतर या दोहोंमध्ये दीर्घ काळानंतरक अनुक्रमे २७% आणि २९% वाढ झाली. (१४ डिसेंबर २०२० रोजी) ओपेक राष्ट्रांकडून बाजारपेठेत तेलाच्या पुरवठ्यात जमवून आणलेले संतुलन आणि जगाच्या विविध भागात लसीबाबतचा आशावाद यामुळे तेल बाजारातील सकारात्मकता वाढली. यामुळे जागतिक अर्थव्यवसस्थेत तेलाला सर्वाधिक वलयांकित स्थान मिळाले. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.

अमेरिकेने लसीकरणाची मोहीम सुरू केली: अमेरिकेने लसीकरणाची मोहीम सुरू केली असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २० दशलक्ष लोकांपर्यंत वितरित केले जाणार आहेत. यासाठी ४० दशलक्ष लसीचे डोस पुरेसे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत १०० दशलक्षांपेक्षा किंवा अमेरिकेतील लोकसंख्येच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची प्रतिकारशक्ती लसीद्वारे वाढवली जाईल.

अमेरिकेत लस येण्यास सुरुवात झालेली असली तरीही अनेक प्रमुख युरोपीय देशांमध्ये कोव्हिड-१९ चा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे इंधनाची मागणी घटली. जर्मनी हा जगाच्या अर्थव्यवस्थेतील चौथ्या क्रमांकावरील देश असून, बुधवारपासून विषाणूविरोधातील संघर्षादरम्यान तेथे कठोर लॉकडाऊन सुरु होणार आहे.

ख्रिसमस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर इटलीतदेखील कडक निर्बंध लादले जाणार आहेत. जर्मनीतील बहुतांश दुकाने १० जानेवारीपर्यंत बंद राहतील. नव्या वर्षात ती सुरु राहण्याची अगदी धूसर शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपमधील घटनांमध्ये विरोधाभास दिसून येत असल्याने ओपेकने २०२१ मध्ये तेलाच्या मागणीत ३५०,००० बॅरल प्रति दिन एवढी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रभाव कायम असल्याने ही स्थिती राहील.

तेल बाजारासाठी पुरवठ्याची बाजू चिंताजनकच: जानेवारीपासून एका आठवड्यात सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले. कारण नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून उत्पादक क्रूडच्या किंमतीत प्रति बॅरल ४५ डॉलर किंमतीसह वेलपॅडवर परत येत आहेत.

या आठवड्यात ११ डिसेंबरपर्यंत तेल व वायू रिगची संख्या फ्युचर आउटपूटच्या निर्देशांकावर १५ ते ३३८ पर्यंत वाढलेली दिसून आली. या आठवड्यात अमेरिकी तेल रिगची संख्या १२ ते २५८ पर्यंत वाढली. तर एप्रिल २०१९ पासून गॅस रीगमध्येही ४ ते ७९ पर्यंत वाढ झाली. बेक ह्युज्स डेटानुसार ही आकडेवारी जारी करण्यात आली. मे महिन्यापासून तेल व वायू रीगच्या संख्येत उच्चांक गाठला. अमेरिकी क्रूड तेलाचे उत्पादन मे महिन्यात अडीच वर्षातील निचांकानंतर आता वाढले असले तरीही त्यात या वर्षी ९१०,००० बॅरल प्रति दिन ते ११.३४ दशलक्षांपर्यंत घट झाली.

तर दुसरीकडे लिबियातील लेत उत्पादन १४ डिसेंबर २०२० पर्यंत १.२८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढे झाले. नोव्हेंबर अखेरीस १.२५ दशलक्ष बॅरल एवढ्या प्रमाणावरून त्यात वृद्धी झाली.

२०२१ मध्ये तेलाच्या मागणीत घट होण्याचा ओपेकचा अंदाज: पुढील वर्षात जागतिक तेलाच्या मागणीत ५.९० दशलक्ष बॅरल प्रतदिन एवढी वाढ होऊन ती ९५.८९ दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत जाईल, असा अंदाज ओपेक समूह राष्ट्रांनी वर्तवला. महिनाभरापूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हे प्रमाण ३५०,००० बीपीडी ने कमी आहे. क्रूडच्या मागणीचे प्रमाण पुढील वर्षात २००,००० बीपीडीने घसरून २७.२ दशलक्ष बीपीडीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज समूहाने वर्तवला.

एप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाने सुधारणा दर्शवली. ओपेक+ अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज व सदस्य राष्ट्रांनी निक्रमी उत्पादन कपात केल्याने तेल बाजारात संतुलन राखले गेले. जानेवारी महिन्यात ओेपेक+ समूह पुरवठ्यावरील निर्बंध कमी करणार असून ५००,००० बॅरल प्रतिदिन एवढी पुरवठ्यात भर पडेल. तेल बाजाराला आणखी आधार मिळण्यासाठी ही पुरवठ्यातील वाढ कमी गतीने करण्यात येईल.

पुढे काय?: यापुढील तेलाच्या दरातील वाढ ही जागतिक पातळीवरील इंधनाच्या मागणतील वाढीची आशा आणि जगभरात लस येण्याच्या आशेवर अवलंबून असेल. तेल बाजारपेठेला संतुलित ठेवण्यासाठी ओपेकच्या प्रयत्नांना यश मिळाले . मार्च महिन्याच्या अखेरीस तेलाच्या दरात वाढीसह आशावाद कायम राहिला. तेलाच्या किंमतीचा विचार केल्यास ही वाढ कायम राहण्याकरिता कोव्हिड-१९ च्या रुग्णांच्या संख्येतही घट होणे अपेक्षित आहे.

एका महिन्याचा विचार केल्यास डब्ल्यूटीआय तेलाचे दर (सीएमपी: $४७) हे $५२/बीबीएलपर्यंत वाढतील तर एमसीएक्स ऑइल फ्युचर(सीएमपी: रुपये.३४५२/बीबीएल) हे रुपये. ३९००/बीबीएलपर्यंत वाढ घेतील असा अंदाज आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!